घरमहाराष्ट्रअजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करुनच शपथ घेतली होती, आमदार संजय गायकवाड...

अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करुनच शपथ घेतली होती, आमदार संजय गायकवाड यांची टीका

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवाचा परिसर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणा देत दणाणून सोडला. या घोषणेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे हे अग्रस्थानी असल्याचे दिसून आले. सरकारची तुलना गद्दार अशी केल्याने शिंदे गाटातील आमदार चांगलेच संतापले. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीवर पलटवार करताना अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, ईडी सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय, आले रे आले ५० खोके आले, खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली. त्यानंतर, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका केली.

- Advertisement -

संजय गायकवाडांची टीका –

विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केली. पण, राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करुनच शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला.

- Advertisement -

धनंजय मुंडेंवर टीका –

धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करताना गायकवाड म्हणाले, धनंजयची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्हीवर बाहेर आली आहेत. जो लोकप्रतिनिधी आहे आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमाच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही, अशा शब्दात धनंजय मुंडेंवर गायकवाड यांनी सडेतोड पलटवार केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -