संजय शिरसाटांचे नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण, राग येणं स्वाभाविक, विषय तिथे संपला…

mla sanjay shirsat commented on tweet shivsena uddhav thackeray eknath shinde devendra fadanvis cabinet expansion

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन केली. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात नाराजी नाट्य सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. यात शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट केला, ज्यात उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. संजय शिरसाट यांनी स्वत: माध्यमासमोर येत आपल्या नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

पहिल्यापासून सांगत आलो की, शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचे कुटुंब असेल त्यांच्याबद्दल आम्ही आदर भाव ठेवून आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही उद्या काहीतरी गडबड करणार आहोत. मंत्रिपदाचा काळ होत त्यात अनेक घटना घडत असतात. आम्हालाही नंदनवनला बोलवण्यात आलं होतं. आम्ही चर्चा सुद्धा केल्या, पण मंत्रिमंडळ विस्तारात नावं कमी जास्त होत असताना राग येणं, संताप येणं आणि एकमेकांचे विचार मांडणे या गोष्टी होतात. असं शिरसाट यावेळी म्हणाले.

या गोष्टीला उठावाशी संबंध नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय घेतला. चर्चा करून मंत्रिमंडळाची अंतिम यादी फायनल झाली. म्हणून या गोष्टीला उठावाशी संबंध नाही असे शिरसाट म्हणाले.

चेहऱ्यावर दिसणं स्वाभाविक

राजकारणात पुढं जावं वाटणं असं मला वाट नाही का? संधी मिळावी असं वाटत नाही का? असं वाटणं साहाजिक आहे, आणि त्याची नाराजी चेहऱ्यावर दिसणं देखील स्वाभाविक आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही, मी नाराज होतो, त्यावेळी त्यांनी मला समजवलं, त्यांनी पुढच्या वेळी पाहू, विषय तिथे संपला, असही शिरसाट म्हणाले.

पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार संधी मिळणार असल्याचा शब्द दिला

मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, मात्र याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील, पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार मला संधी मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले.


मी एकनाथ शिंदेंसोबतच, मंत्रिपदासाठी दबाव आणला नाही, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण