घरमहाराष्ट्रआमदार संजय शिरसाट यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

आमदार संजय शिरसाट यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

Subscribe

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरशाट यांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आला होतं. दरम्यान, नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांना पुढील एक आठवडा घरी आराम करण्याचा सल्ला देखील डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

खरंतर, मागील चार दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांना रात्रीच्या वेळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तत्काळ त्यांना उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट नाराज असल्याची होती चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या 40 हून अधिक बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. संजय शिरसाट यांनीही ही नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली, या नाराजीमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.

- Advertisement -

संजय शिरसाट हे शिवसेनेतून निवडणून आलेले आमदार आहेत. मात्र ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.


हेही वाचा :

संजय राऊतांना मीडियापासून ठेवणार दूर! कोर्टाबाहेर पोलिसांकडून कडक बंदोबस्त

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -