घरताज्या घडामोडीपक्षप्रमुखपद मुख्यमंत्र्यांना मिळालं तर आनंदच, आमदार संतोष बांगर यांचं मोठं विधान

पक्षप्रमुखपद मुख्यमंत्र्यांना मिळालं तर आनंदच, आमदार संतोष बांगर यांचं मोठं विधान

Subscribe

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? यावरील सुनावणी ३० जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे पक्षातंर्गत निवडणुका घेऊन पुन्हा हे पद स्वत:कडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची जी निवड आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर ते आम्हाला निश्चितपणे आवडणार आहे. धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -

बाळासाहेबांनी जिवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. त्यामुळे या पदाला मुदतवाढ देण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी केली आहे. जर, मुदतवाढ देता येत नसेल तर नेता निवडीसाठी आणि प्रतिनिधी सभा घेण्याची मुदत द्यावी, अशीही मागणी ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांकडून करण्यात आली आहे. मूळ पक्षात फूट पडलीच नाही. त्यामुळे सर्वाधिक संख्याबळ आमच्याकडेच आहे, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करायचे आहे. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता कोण पास होणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : शिवसेना पक्षचिन्हासह पक्षप्रमुखपदही अधांतरी, निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारीला सुनावणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -