Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिंदेंचे आमदार संतोष बांगर लग्नात येताच ‘50 खोके-एकदम Ok’च्या घोषणा, Video व्हायरल

शिंदेंचे आमदार संतोष बांगर लग्नात येताच ‘50 खोके-एकदम Ok’च्या घोषणा, Video व्हायरल

Subscribe

राज्यातील मिशन गुवाहाटीच्या काळात वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेले नेते म्हणून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे. लग्नसोहळ्यासाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. या प्रकारा संबंधित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संतोष बांगर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी कार्यक्रमातून तातडीने काढता पाय घेतला.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला संतोष बांगर यांनी हजेरी लावली होती. यावेळी, लग्न मंडपात पहिल्यापासून उपस्थित असलेले परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचा बांगर यांनी चरण स्पर्श केला. त्याचवेळी, तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांकडून`पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळासाठी तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेवटी बांगर तिथून निघून गेले. परंतु या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

यापूर्वी उदय सामंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक आमदारांसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा दिलेल्या आहे. परंतु बांगर यांच्यासमोर घोषणाबाजी केल्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेकवेळा सभेच्या माध्यमातून 50 खोके-एकदम ओकेच्या घोषणा दिल्या आहेत. ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला जात आहे. विधानसभेच्या पायरीवरही 50 खोके-एकदम ओकेचे बोर्ड झळकले होते.


हेही वाचा : ‘Indic Tales’ वेबसाइटवर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिवांना निर्देश


 

- Advertisment -