काँग्रेस नको रे बाबा, मी अपक्षच ठीक; आमदार सत्यजित तांबेंचं मोठं वक्तव्य

mla satyajeet tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडून विजयी झालेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. आता काँग्रेस नको रे बाबा, मी अपक्षच ठीक, असं आमदार सत्यजित तांबे म्हणाले. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात शंका निर्माण होत आहे.

अकोले तालुक्याच्या एका सत्कार समारंभ कार्यक्रमात सत्यजित तांबे यांनी आपली इच्छा बोलावून दाखवली. अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक या गावात आमदार तांबे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षात आता परत जायला नको. झाला एवढा अन्याय आता ठीक आहे. पक्षापेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगारांसाठी कामे करू. आता काँग्रेस नको मी अपक्षच ठीक आहे.

जिल्हा परिषदेत असताना आपल्यावर अन्याय झाला. दहा वर्षे अध्यक्षपद मिळू दिले नाही. निधी वाटपातही डावलले गेले, असंही सत्यजित तांबे म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांचे निलंबन मागे घेऊन पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : Big Breaking : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी