Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सत्तासंघर्षाच्या निकालनंतर शाहाजीबापू पाटलांचा विरोधकांना 'हा' इशारा तर, पवारांना टोला

सत्तासंघर्षाच्या निकालनंतर शाहाजीबापू पाटलांचा विरोधकांना ‘हा’ इशारा तर, पवारांना टोला

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या सुनावणीवेळी न्यायालायने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार हे स्पष्ट झाले. असे असले तरी १६ अपात्र आमदारांवर कारवाई होणारच असे विरोधकांकडून बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या सुनावणीवेळी न्यायालायने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार हे स्पष्ट झाले. असे असले तरी १६ अपात्र आमदारांवर कारवाई होणारच असे विरोधकांकडून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला. शिवाय, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. (mla shahajibapu patil criticizes leader of opposition ajit pawar)

सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील मरळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. “राज्यात आता पेटवा… आपटलं यासारख्या खालच्या पातळीवरील भाषा विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. दोन ते तीन जण अशी भाषा वापरत आहेत. तरण्याताठा गडी तब्येतीचे कारण सांगून अडीच वर्षे घरात होता. आम्ही गुजरातला निघून गेल्यापासून त्यांचा मणक्याचा आजार कुठे गेला? हेच समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगात आलेल्या बाईसारखी विरोधकांची वागणूक आहे. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांचे आवाज घुमत असून कर्नाटक निकालानंतर मातोश्रीबाहेर फटाके वाजत आहेत. तर संजय राऊत उड्या मारत आहेत”, अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

याशिवाय, “खासदार शरद पवार यांचे पुतणे माजी अर्थमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, त्यांना नवरीच मिळत नाही”, असा टोला अजित पवारांना लगावला.

“आपण महाविकास सरकार काळात गोरगरिबांच्या आजारपणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी म्हणून 165 पत्रे दिली होती. त्यावेळी केवळ सव्वादोन कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 महिन्यांत गोरगरिबांना आजारपणात मदत व्हावी म्हणून 67 कोटी रुपये दिले आहेत. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्यातील फरक आहे”, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, “राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हेही विकासकामात कधीच कमी पडत नाहीत. त्यामुळेच आता शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांना 1 लाख मताने विजयी करावे”, असे आवाहनही शहाजीबापू पाटील यांनी केले.


हेही वाचा – काँग्रेस सरकार येताच नव्या सीबीआय संचालकाची नियुक्ती; डीजीपी प्रवीण सूद यांना संधी

- Advertisment -