घरमहाराष्ट्रराऊतांचा भोंगा बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात ईडीचे कटकारस्थान, सुनील राऊतांची टीका

राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात ईडीचे कटकारस्थान, सुनील राऊतांची टीका

Subscribe

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई नंतर आमदार सुनील राऊत यांनी पत्रकारांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्रिपद मिळाले. मात्र, आता राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात ईडीचे कटकारस्थान सुरु असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला.

संजय राऊतांच्या भोंग्याला घाबरून कारवाई –

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना सुनील राऊत म्हणाले, जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करते आहे. हे सूडाचे राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार..आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा सुनिल राऊतांनी दिला.

सुनील राऊतांनी ईडीचे आरोप फेटाळले –

- Advertisement -

जमिनीवरून विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचा फॉर्म भरला होता, तेव्हा तिचे मूल्य 1 कोटी 6 लाख रुपये होती. रेडी रेकनरखाली जमीन घेतलेली नाही. काहीच गैर व्यवहार झालेला नाही. पण त्यांना काहीही करून संजय राऊत यांना अडकवायचे आहे. ती लिंक लागत नाहीये, म्हणून संजय राऊतांची कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे, असे सुनील राऊत म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -