घरमहाराष्ट्रकोकणात पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

कोकणात पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राजकीय राड्यांनी विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुडाळमध्ये राडा पाहायला मिळाला.

सिंधुदुर्ग आणि राजकीय राडे हे प्रकरण तसं जुनेच आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय राड्यांनी विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुडाळमध्ये राडा पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठं व्हायरल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी हा सगळा प्रकार घडल्याच समजतंय.

कुडाळ येथील पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना त्यांच्याच मतदार संघात धक्काबुकी करण्यात आली. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये थोडावेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना विरोध केला. यावेळी दोन्ही गटामध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर याचे रूपांतर धक्काबुक्कीत होऊन वातावरण चांगलंच तापलं होतं.

- Advertisement -

हे ही वाचा: निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मुस्लिमांचे जीवन कठीण असतं तर…’, ओवैसींनी दिलं उत्तर

उपस्थित लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. आपल्या मतदारसंघातील नळपाणी योजनेच्या भुमिपुजनासाठी गेलेल्या आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. युवा मोर्चाचे पदाधीकारी व कट्टर राणे समर्थक असलेले पप्या तवटे आमदार वैभव नाईक यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, वैभव नाईक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

हे ही वाचा: NCPचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया….

यावर, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत जागरुक नागरिकांचे आभार मानले आहेत. निलेश राणेंनी ट्विट करत सांगितले, ‘केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करणाऱ्या वैभव नाईकला गावा गावातून विरोध होत आहे. आज कुडाळ तालुक्यातील पावशी गावात स्थानिकांनी एकत्र येत उबाठा गट आमदार वैभव नाईकचा अक्षरशः पळवून लावला.’ य़ाबद्दल त्यांनी जागरूक नागरिकांचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -