आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ, मालमत्तेची प्रत्यक्ष चौकशी सुरू

राज्य उत्पादन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम यांची संयुक्त कारवाई

MLA Vaibhav Naik

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची प्रत्यक्ष चौकशी राज्य उत्पादन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील बंगल्याची मोजमापे घेऊन या बंगल्याचे व्हॅल्युएशन केले जात आहे.

राज्य उत्पादन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या ही कारवाई केली जात आहे. या कारवाईने मालमत्तेची थेट चौकशी सुरू झाली असून आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांचे घर होते. त्या ठिकाणी जुन्या घराच्या ठिकाणी नव्याने बंगला बांधण्यात आलेला आहे. या बंगल्याचे बांधकाम किती स्क्वेअर फिटमध्ये आहे आणि त्याचे व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी मोजमाप घेतली जात आहेत. सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता श्रीमती प्रभू , अभियंता प्रमोद कांबळी यांच्यासह राज्य उत्पादन विभागाचे एक पथक हे मोजमाप करत आहे. नाईक यांच्या बंगल्याची मोजमापे घेतल्यानंतर बंगल्याला किती कोटी रुपये खर्च आला आणि वैभव नाईक यांनी आपल्या व्यवहारात या बांधकामासाठी किती खर्च दाखवला आहे, याचे ऑडिट केले जाणार आहे.


हेही वाचा : गिरे तो भी टांग उपर.., पवारांच्या विधानाचा भाजप नेत्याने घेतला समाचार