घरताज्या घडामोडीआता आमदारांच्या गाड्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांची घोषणा!

आता आमदारांच्या गाड्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांची घोषणा!

Subscribe

आमदारनिधी वाढवल्यानंतर आता अर्थमंत्री अजित पवारांनी आमदारांसाठीच्या गाड्यांसाठी दिला जाणारा निधी तिप्पट वाढवल्याची घोषणा केली.

एकीकडे आमदारनिधी २ कोटींवरून ३ कोटी केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांसाठीची नवी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता आमदारांना आत्तापर्यंत मिळणारी १० लाखांची रक्कम ३० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांसाठी या अधिवेशनामध्ये डबल धमाकाच झाल्याचं म्हणता येईल. यानुसार आता आमदारांना प्रत्येकी ३० लाख रुपये वाहनासाठी मिळणार आहे. त्याचं मुद्दल आमदारांनी ५ वर्षांमध्ये फेडायचं आहे. त्यावरचं व्याज मात्र राज्य सरकार फेडणार आहे. त्यामुळे आमदारांना ३० लाख रुपयांची रक्कम गाडीसाठी कर्जाऊ देण्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना केली.


Video – छगन भुजबळांनी केलं आमदार निधी वाढीचं समर्थन!

नव्या आमदारांना गाडी घेणं कठीण?

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना अर्थसंकल्पामध्येच अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधी २ कोटी रुपयांवरून ३ कोटी करण्याची घोषणा केली. त्याला सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी देखील बाकं वाजवून समर्थन दिलं. त्यानंतर आज विधानसभेमध्ये बोलताना जेव्हा अजित पवार यांनी आमदारांना गाड्यांसाठी मिळणाऱ्या कर्जाऊ निधीची रक्कम १० लाखांवरून ३० लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा देखील सर्वपक्षीय आमदारांनी बाकं वाजवून समर्थन दिलं. ‘ज्या आमदारांची आर्थिक परिस्थिती चांगली असते, त्यांच्यासाठी १० लाखांमध्ये गाडी घेणं शक्य होतं. मात्र, काही आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी नवीन गाडी घेणं जिकिरीचं होत असल्यामुळे हा निधी १० लाखांवरून ३० लाख करण्याचा निर्णय आम्ही घेतला’, असं अजित पवारांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -