घरमहाराष्ट्रआमदारांच्या राजीनाम्याचे गौडबंगाल, राजीनामे देऊनही आमदारकी राहणार शाबूत

आमदारांच्या राजीनाम्याचे गौडबंगाल, राजीनामे देऊनही आमदारकी राहणार शाबूत

Subscribe

सध्या राज्यामध्ये मराठा ठोक मोर्चामुळे वातावरण तापलेले असतानाचा त्याचा फायदा आता राजकीय नेते घेत असल्याचे दिसत आहे. आम्हाला मराठा समाजाचा किती कळवळा आहे हे दाखवण्यासाठी ६ आमदारांनी आपले राजीनामे दिले. त्यातल्या चार आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना औपचारिकपणे पत्र दिले असून, भाजपच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे आपले राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जरी आमदारांनी राजीनामे दिले असले तरी हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्वीकारणे अशक्य असल्याचे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. त्यामुळे आमदारांच्या राजीनामा देण्यामागील गौडबंगाल काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

हरिभाऊ बागडे नेमकं काय म्हणाले

आमदारांनी राजीनामा दिला असला तरी पुढच्या अधिवेशनापर्यंत आमदारकी कायम राहणार आहे. विधिमंडळ नियमानुसार राजीनामा दिलेल्या सदस्यांचे राजीनामे सभागृहात वाचून दाखवले जातात. त्यानंतर कारणं नमूद करून ते स्विकारले किंवा फेटाळले जातात, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. तसेच राजीनामा स्वीकारल्यास रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते. अशी प्रक्रिया असल्यामुुळे १९ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनापर्यंत आमदारांचे राजीनामे स्विकारले जाऊ शकत नाही असे बागडे म्हणाले.

- Advertisement -

हे सरकार घाबरले आहे – “चिकटगावकर”

मला माझ्या पदापासून राजीनामा देण्याचा १०० टक्के अधिकार आहे. राजीनामा दिल्यावर तो त्यांना स्विकारावा लागणार. माझ्या मतदारसंघातील तरूण शहीद झाला. त्यावेळी तमाम महाराष्ट्रातून मला फोन आले की तुम्हाला आमदारकी महत्त्वाची आहे का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. त्यामुळे मी माझ्या समजासाठी राजीनामा दिला. विरोधकांनी राजीनामे  दिल्यावर लोकं याची कारणे मागतील. लोकांच्या प्रश्न उत्तरांपासून सरकार घाबरले आहे.असे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर म्हणाले.

यांनी दिले राजीनामे –

- Advertisement -

हर्षवर्धन जाधव – शिवसेना

चिकटगावकर – राष्ट्रवादी

भारत भालके – काँग्रेस

रमेश कदम – राष्ट्रवादी

राहुल आहेर – भाजपा

सीमा हिरे – भाजपा
विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याचे चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे या दोन्ही आमदारांनी आपलेे राजीनामे मराठा क्रांती समन्वयकांकडे दिले आहेत. त्यामुळे ही फक्त नौटंकी होती का? असा सवाल निर्माण झाला आहे.

आज दोन आमदारांचे औपचारिकपणे राजीनामे

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी आज विधानसभेच्या अध्यक्षांना राजीनामा दिला. या राजीनाम्यामागील कारण मराठा, मुस्लीम, धनगर समाजाला आरक्षण असल्याचे त्यांनी राजीनाम्यात सांगितले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रमेश कदम हे सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -