Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर अजित पवार गटाच्या आमदारांची भिडेंवर टीका, म्हणाले...

Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर अजित पवार गटाच्या आमदारांची भिडेंवर टीका, म्हणाले…

Subscribe

चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. परंतु अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

मुंबई : 23 ऑगस्ट 2023 हा दिवसाच्या भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. काल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या भुपृष्ठावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या मोहीमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे विशेष असे कौतुक करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. परंतु अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. कारण ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर मिटकरी यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी टीका करताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ना घेऊन भिडेंना डिवचले आहे. (MLAs of Ajit Pawar group criticized Sambhaji Bhide. After successful landing of Chandrayaan-3)

हेही वाचा – चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात; सचिननेही केले ट्वीट…

- Advertisement -

काल (ता. 23 ऑगस्ट) सोशल मीडियावर इस्रोचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्याचप्रमाणे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा इस्रोचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. पण काही वेळानंतर त्यांनी एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी संभाजी भिडे यांचा फोटो पोस्ट केला. मिटकरींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “”मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात… आता कसं 😄#जयहिंद” त्यांच्या या पोस्टनंतर काहींनी त्यांना समर्थन केले तर काही नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल करण्यात आले.

 मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात असतात. काही दिवसांपूर्वी भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. विरोधकांनी तर भिडेंना अटक करण्याची मागणी देखील केली होती. परंतु, सरकारकडून मात्र भिडेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर सत्तेत असलेले परंतु शिंदे-फडणवीस यांच्या विचार सरणीच्या विरोधातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भिडेंचे नाव न घेता महात्म्यांचा अपमान खपवून घेणार नाही, असे सांगितले.

- Advertisement -

त्यामुळे आता राज्य सरकारमध्ये दोन विचारसरणीचे लोक एकत्र आहेत. त्यातही भिडेंना पाठिंबा देणाऱ्यांची सरकारमध्ये संख्या जास्त आहे. ज्यामुळे अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटनंतर आता आणखी कोणता वाद होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -