घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अब्दुल सत्तार हाय हाय... महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात आक्रमक

अब्दुल सत्तार हाय हाय… महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात आक्रमक

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणुकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा… खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे… सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

हेही वाचा – शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सभागृहात महिला आमदार आक्रमक, अध्यक्षांनी दिले निर्देश

शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं  वादग्रस्त विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. मी माझ्या मतदारसंघात फिरलो आहे. शेतकऱ्यांचे फार काही नुकसान झाले नाही. मोठं नुकसान नाही. परंतु जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहोत, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

तसंच, आमदार राहुल कुल यांच्या भीम साखर कारखान्यातील ५०० कोटींचा घोटाळा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाहेर काढला आहे. यावरूनही विरोधकांनी राहुल कुल यांना निशाण्यावर घेतलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज विधानभवनात आंदोलन केले.


शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणुकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा… खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे… सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो…अशा घोषणा विरोधकांनी केल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -