घरमहाराष्ट्रअमरावतीतही भाजपाला धक्का! मविआचे धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

अमरावतीतही भाजपाला धक्का! मविआचे धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

Subscribe

अमरावती पदवीधर मतदारसंघातील अंतिम निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. तर भाजप उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. तब्बल 30 तासांच्या मतमोजणीनंतर हा निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार रणजित पाटील, काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलवार अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. या लढतीत मविआ उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची मत मिळाली आहे. तर भाजप उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला, धीरज लिंगाडे यांना 46344 मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मतं मिळाली आहे. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे.

- Advertisement -

अमरावती पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीला काल सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली. या मतमोजणीत सुरुवातीपासून धीरज लिंगाडे आघाडीवर होते. मात्र सायंकाळी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी अवैध बाद मतांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली, यानंतर फेरमतमोजणी सुरु झाली. तब्बल 30 तासांच्या फेर मतमोजणीनंतर अखेर लिंगाडे विजयी निश्चित झाले आहेत. यात तीन हजारांच्या मत फरकाने रणजीत पाटील यांना पराभूत केले.

महाराष्ट्रातील नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा पाच मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मविआने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपला पराभूत केलं आहे. यात नागपूर, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.  नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. यामुळे तीन मतदारसंघात मविआला विजय मिळाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ….म्हणून सत्यजित तांबेंनी काँग्रेसबरोबर जावं; अजित पवारांनी दिला सल्ला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -