घरताज्या घडामोडीMLC election: आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा...

MLC election: आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा

Subscribe

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी काही घडामोडी घडत आहेत. कोल्हापूरातून अमल महाडिक यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या झालेल्या बैठकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली. यानुसार मुंबई, कोल्हापूर आणि धुळे नंदुरबारच्या जागेवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

भाजप नेते धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमल महाडिक यांचा अर्ज मागे घेण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. धनंजय महाडिक म्हणाले की, आता इथूनपुढे राज्यात जिल्हा परिषद अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे राज्यात समन्वय राहावा आणि सलोखा राहावा म्हणून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानुसार निर्णय झाला आहे. मुंबई भाजपसाठी महत्त्वाची जागा होती ती विजयी करण्यासाठी काँग्रेसनं माघार घेतली परंतु त्याविरोधात कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी होती असे धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

धुळे नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे अशी मागणी भाजपने आग्रही ठेवल्यामुळे अमरिश पटेल यांचीही निवडणूक बिनविरोध करायची म्हणजे भाजपच्या दोन जागा आणि त्याविरोधात कोल्हापूरची एक जागा त्यांना देण्यात यावी असे ठरले. फडणवीसांनी फोन करुन अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानुसार कोल्हापूरमधून विधानपरिषदेसाठी अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता. तसेच शोमिका अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता हे दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक यांनाही फोन करुन फडणवीसांनी सुचना दिल्या असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.

अमल महाडिक काय म्हणाले?

मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. म्हणून ही विधानपरिषदेची निवडणूक लढवत होतो. पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आले त्यामुळे निवडणुकीला सामोरे गेलो परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार विधानपरिषदेचा अर्ज मागे घेत असल्याचे अमल महाडिक यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘एसटी संप, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी’; आव्हाडांना नेमकं म्हणायचंय काय?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -