घरताज्या घडामोडीMLC election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या केणेकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, प्रज्ञा सातवांची बिनविरोध निवड...

MLC election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या केणेकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, प्रज्ञा सातवांची बिनविरोध निवड होणार?

Subscribe

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल आहे. तर भाजपकडून औरंगाबाद भाजप अध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. विधानभवनात संजय केणेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आला असली तरी हा उमेदवारी अर्ज पुन्हा मागे घेण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसची जागा असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर काँग्रेसकडून प्रज्ञा सावंत यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. राज्यसभेची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस चर्चा करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद भाजप अध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या वेळी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु एखाद्या जागेवरील प्रतिनिधीचे निधन झाल्यावर जागा रिक्त झाल्यास ती त्या जागी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रजनी पाटील यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच आता पुन्हा होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची जागेची मुदत २०२४ पर्यंत असल्यामुळे जो उमेदवार निवडला जाईल तो पूर्णवेळ विधानपरिषदेचा सदस्य राहणार आहे.

विधानपरिषदेची निवडणूक येत्या २९ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. तर १६ नोव्हेबंरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. ही निवडणूक आमदारांच्या माध्यमातून होणार आहे. महाविकास आघाडीकडे आमदारांची जास्त संख्या असल्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय पक्का मानला जात आहे. परंतु ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. राज्यसभा निवडणुकीसारखा अर्ज यावेळीही संजय केणेकर यांचा अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊन काँग्रेस उमेवार विजयी होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित, सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -