घरताज्या घडामोडीmlc election: उमेदवारी अर्ज दाखल करताना बावनकुळेंना फडणवीसांची क्लीन चिट, फडणवीस म्हणाले...

mlc election: उमेदवारी अर्ज दाखल करताना बावनकुळेंना फडणवीसांची क्लीन चिट, फडणवीस म्हणाले…

Subscribe

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून विधानपरिषदेच्या जागेवर निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी फडणीसांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना क्लीन चिट दिली आहे. बावनकुळे यांनी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केलं आहे. काँग्रेसकडून बावनकुळेंच्या विरोधात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. बावनकुळे यांनी अर्ज दाखल करताना नगपूरमध्ये शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्हाला अतिशय आनंद आहे की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा सहकारी पुन्हा एकदा विधीमंडळात येत आहेत. त्यांनी मंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केले आणि एक जागरुक लोकप्रतिनिधी कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे. गेल्या २ वर्षात पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगले काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. आज त्या कामाची पावतीच त्यांना मिळाली आहे. मला विश्वास आहे की, भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभूतपुर्व विजय या ठिकाणी प्राप्त करु असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

जबाबादरी निश्चित पार पाडू – बावनकुळे

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, मला महाराष्ट्र विधानपरिषदेत विदर्भाची आणि महाराष्ट्राची काम करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडेल आणि ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक घोषित करण्यात आली आहे. एकूण ५ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यामधील २ जागा या मुंबईत आहेत. मराठवाडा, विदर्भातील जागा आहेत. या जागांवर १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल प्रक्रिया १४ डिसेंबरला लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपला मोठा धक्का, छोटू भोयर यांचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -