घरताज्या घडामोडीCAA-NRC ला पाठिंबा देण्यावरुन मनसेत संभ्रम

CAA-NRC ला पाठिंबा देण्यावरुन मनसेत संभ्रम

Subscribe

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा आणि अजेंड जनतेसमोर ठेवला. मात्र पक्षाच्या अजेंड्यावर अद्याप पक्षातच एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे. मनसेतर्फे आज रंगशारदा हॉटेल येथे ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये CAA आणि NRC पाठिंबा देण्याबाबत संभ्रम असल्याचे समोर आले आहे. दोन्ही कायद्यांना पाठिंबा देऊन आपण भाजपला समर्थन देत आहोत का? असे प्रश्न पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना विचारल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत न्यूज १८ लोकमत या संकेतस्थळाने वृत्त प्रकाशित केले आहे.

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आळवत सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या बाजूने आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी दोन्ही कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणाही केली. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज पक्षाची बैठकी घेण्यात आली होती. मात्र राज ठाकरे केवळ १० मिनिटांत बैठकीतून निघून गेले. ते गेल्यानंतर पक्षाची ही नवी भूमिका भाजपसोबत जाण्याचे संकेत आहेत का? मग त्याआधी आपण भाजपविरोधात भूमिका घेतल्या त्याचे काय? असे प्रश्न काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारले.

- Advertisement -

प्रकृती ठिक नसल्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा हॉटेलमधील बैठकीतून काढता पाय घेतला असला तरी उद्या (दि. २८ जानेवारी) रोजी पुन्हा एकदा कृष्णकुंज या ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे काय बोलतात? याकडे आता पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे वाचा – ‘मला हिंदुह्रदयसम्राट म्हणू नका’; १० मिनिटांत राज ठाकरे बैठकीतून बाहेर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -