Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी वाहनचालकांकडून मनमानी दंड वसुलीबाबत मनसे आक्रमक; उद्या करणार आंदोलन

वाहनचालकांकडून मनमानी दंड वसुलीबाबत मनसे आक्रमक; उद्या करणार आंदोलन

Subscribe

बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक वाहन चालकांना या दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागतो आहे. परंतु, ई-चलनाद्वारे होणारी दंडात्मक कारवाई ही आता वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहे.

बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक वाहन चालकांना या दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागतो आहे. परंतु, ई-चलनाद्वारे होणारी दंडात्मक कारवाई ही आता वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. (MNS Aggressive on Collecting Arbitrary Fines from Drivers Will protest tomorrow In Mahim Mumbai)

या पत्रात ‘सर्व सामान्य जनता या ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे मेटाकुटीला आली असून दुसऱ्या बाजूला अनेक बेकायदेशीर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे चालू आहे’, असल्याचे लिहिण्यात आले आहे. याशिवाय, ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी गुरूवारी (1 जून) माहिम वाहतूक पोलीस चौकीच्या परिसरात मनसेच्या वाहतूक सेनेकडूम आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसेच्या पत्रात काय?

- Advertisement -

ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. केंद्रीय वाहतूक धोरणाच्या कलम ११२ (२) नुसार वाहतूक विभागाने रस्त्यावरील सर्व सोयी-सुविधा पुरविल्या पाहिजेत वास्तविकपणे सोयी-सुविधा पुरविण्यास असमर्थ असताना नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवून त्यानाच कायद्याचा धाक दाखवून दंडात्मक कारवाई करणे हे चुकीचे आहे.

आपणास सूचित करण्यात येते की, ऑनलाईन ई-चलनाद्वारे होणान्या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेला मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई सारख्या रहदारीच्या ठिकाणी शाळा कॉलेज परिसरामध्ये अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जात असताना, अनेक वेळा रहदारीच्या समस्याना सामार जात असताना हेल्मेट व नो पार्किंग या सारखे अनेक दंड सोसावे लागत आहेत. अनेक वेळा पालक आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जातात त्याचवेळी त्यांनी उभी केलेली दुचाकी व चारचाकी ही वाहने वाहतूक विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे घेऊन जातात. वास्तविकपणे नो पार्किंगमध्ये जर वाहन उभे असेल तर किमान ५ वेळा तरी क्षेपकावरून सूचना करणे गरजेचे असते, तरी देखील वाहनाचा दंड मोबाईलवर ई-चलनाद्वारे येतो काही वेळा तर वाहनाचा चालक शौचालयमध्ये लघुशंका करायला गेला तरी त्यांच्या वाहनावर ई- चलनाद्वारे दंड आकारला जातो, अनेक वेळा सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी गैरहजर असताना मात्र मोक्याच्या ठिकाणी जणू शिकार करण्याच्या इराद्याने ते उभे असता वाहनचालक चूक कशी करतो व कधी करतो याच प्रतीक्षेत असतात, या उद्देशाने ई-चलन दंडात्मक कारवाईची प्रक्रिया चालू असून त्याकडे सर्वसामान्य जनतेला नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

- Advertisement -

दुचाकी वाहनधारकांना तर खूपच मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दिवसभरात किमान दोन ते तीन वेळा तरी कागदपत्रे हेल्मेट यांच्या विचारणा होऊन आरसा, सिग्नल लाईट अशा अनेक गोष्टीची विचारणा होऊन किमान पाचशे रुपये दंड हा सोसावा लागतच आहे. सर्व सामान्य जनता या ई-चलनाद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे मेटाकुटीला आली असून दुसऱ्या बाजूला अनेक बेकायदेशीर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे चालू आहे.

तरी याबाबत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो की, जनता जगली पाहिजे कागदा हा जनतेच्या जीवाशी खेळ करणारा नसावा याचा आपण विचार करून या ई-चलन दंडात्मक कारवाईबाबत शिथिलता आणून जनतेला न्याय मिळावा याच अपेक्षा सोबत समस्याची प्रत जोडत आहोत. कळावे.

‘या’ आहेत समस्या

  • वाहन चालक वाहनात बसलेला असताना सुद्धा त्या वाहनाला नो पार्किंग चार्ज मारणे.
  • पोलिस अधिकारी Device ने फोटो काढताना मोबाईल ने फोटो काढतात त्यासाठी कुलवंत कु. सारंगल अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि. ०१/०९/२०२२ रोजी मोबाईलचा वापर पोलिस अधिकारी करतील तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. असे अध्यादेश कळाले आहे. त्याची अमलबजावणी व्हावी.
  • वाहन वरील अगोदरचे फाईन भरण्यास जबरदस्ती करणे न भरल्यास वाहन जमा करणे किंवा ड्रायव्हरचे लायसन्स जमा करणे.
  • एखाद्या वाहनावर ५००रु फाईन असल्यास त्या वाहनावर १५०० रु. च्या फाईन पासूनच सुरवात करणे त्यावर काहीतरी उपाय करावे.
  • कुठल्याही वाहनामध्ये ड्रायव्हर ची अदला बदली असुन या ड्रायव्हर च्या चुकांचे सर्व फाइन मालकांवर करणे
  • जेणेकरून वाहन चालकास किंवा गुन्हा करण्याला याची शिक्षा नसून ती मालकाला होते. ६) माहिम पोलिस चौकी हद्दीत वाहन चालक जेवण करत असताना त्यावर नो पार्किंगचा चार्ज लावण्याऐवजी – FIR दिनांक :- १६ मार्च २०२३ ला गुन्हा रजिस्टर क्र. ११८/ २०२३ कलम २८३ सह कलम १२२ / १७७ करण्यात आले.
  • Device कारवाई करत असताना सोबत त्या Device मध्ये आपल्या ला दंडात्मक कारवाई ची चलान मिळावे जस परिवाहन अधिकाराकडे असतात तसे Device द्यावे. त्या मुळे वाहन चालक व मालक यांना किती दंडात्मक कारवाई झाले ते माहिती कळेल.
  • वाहन चालक वाहन चालवत असताना वाहतूक पोलिस मागून वाहनांचा फोटो काढतात आणि ऑनलाइन फाइन भारतात,
  • गाडी वर किती फाईन असल्यावर गाड़ी जमा करता येते त्याची माहिती किंवा किती फाइन भरून गाडी सुटू शकते. ह्याची माहिती देण्यात यावी.
- Advertisment -