Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी कुडाळमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मनसे आक्रमक, एसटी बस रंगवत केलं आंदोलन

कुडाळमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मनसे आक्रमक, एसटी बस रंगवत केलं आंदोलन

Subscribe

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद कुडाळमध्ये उमटले आहेत. कर्नाटकमध्ये आज ट्रकांवर केल्लया हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. परंतु कुडाळमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्र परिवहनच्या गाड्यांवर दगडफेक झाल्यानंतर कुडाळमध्ये आलेल्या कर्नाटक पासिंग गाड्यावर “जय महाराष्ट्र, जय मनसे” असे लिहून पाठविण्यात आले.

मनसेच्या माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या जोरदार पेटला आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी नेते यावर काही बोलत नाही. तर आज महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बसवर कर्नाटकात दगडफेक झाली. या घटनेचा निषेध माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे सैनिकानी नोंदवला.

- Advertisement -

महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बस सध्या कर्नाटक सीमेपर्यंतच जात आहेत, मात्र कर्नाटक पासिंगच्या एसटी बस बिनदीक्कत महाराष्ट्रात फिरत आहेत. याची जाण कर्नाटक सरकारने ठेवावी व अनुचित प्रकार घडून आणणाऱ्यांना त्यांनी समज द्यावी, असे प्रकार पुन्हा घडल्यास कर्नाटक पासिंगची एकही गाडी मनसे जिल्ह्यात फिरु देणार नाही आणि त्याच माध्यमातून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेच्या वतीने परब यांनी दिला आहे.


हेही वाचा : फेरीवाला धोरण आले दृष्टीपथात


- Advertisement -

 

कुडाळमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून मनसे आक्रमक, एसटी बस रंगवत केलं आंदोलन
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -