‘कोन नाय कोन्चा…’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य मनसेला मान्य?, अमेय खोपकर मांजरेकरांच्या पाठीशी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरुन संताप व्यक्त होत आहे. चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ती आक्षेपार्ह दृश्य मान्य आहेत, असं दिसतंय. कारण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी महेश मांजरेकर यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे.

MNS agrees with offensive scenes in 'Kon Nai Koncha ...' movie, backed by Ameya Khopkar Manjrekar
'कोन नाय कोन्चा...' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य मनसेला मान्य?, अमेय खोपकर मांजरेकरांच्या पाठीशी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरुन संताप व्यक्त होत आहे. चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ती आक्षेपार्ह दृश्य मान्य आहेत, असं दिसतंय. कारण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी महेश मांजरेकर यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो, असं अमेय खोपकर म्हणाले.

महेश मांजरेकर हे मनसे चित्रपट सेनेचे सल्लागार आहेत. परंतु, मांजरेकर मराठी माणसाची, गिरणी कामगारांच्या कुटुंबातील स्त्रियांच्या हिडीस चित्रीकरण करत असतील मनसे आवाज उठवेल असं मराठी माणसाला वाटलं होतं. मात्र, अमेय खोपकर यांच्या प्रतिक्रियेने सर्वच अवाक् झाले आहेत.

‘नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा. पूर्वग्रहदूषित ‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच…असं अमेय खोपकर म्हणाले.

गिरणी कामगार संघर्ष समितीने केला निषेध

लालबाग परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला. महेश मांजरेकर यांच्या सडलेल्या मेंदूने केवळ पैसा प्रसिद्धीसाठी मराठी गिरणी कामगारांची अब्रू वेशीवर टांगत आहेत. चाळीतील संस्कृती बदनाम करुन कुटुंबातील स्त्रियांच्या हिडीस चित्रिकरणावरून गिरणी कामगारात संतापाची लाट कोसळली आहे. गिरणी कामगार संपानंतर बेरोजगार झाले, आया बहिणींनी कष्ट घेऊन कुटुंब सावरली, संकटाच्या काळात संस्कृती जपली, नाती जपली, एकमेकांना मदत केली, मुला मुलींना उत्तम प्रकारे शिकवले, मुलींची लग्न लावली, हा गिरणी कामगारांचा मराठी माणसांचा इतिहास आहे. महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा मराठी माणूस आणि गिरणी कामगारांच्या पिढीला बदनाम करण्याचे उद्योग सुरू केलेत त्याचा आम्ही ‘गिरणी कामगार संघर्ष समिती’ निषेध करीत आहोत, असं समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी म्हटलं.


हेही वाचा – महेश मांजरेकरांची शरणागती