पुण्यातसुद्धा ज्ञानवापीप्रमाणे मंदिराच्या जागी मशीद, मनसेचा दावा

MNS Ajay shinde said mosque instead of temple in pune
पुण्यातसुद्धा ज्ञानवापीप्रमाणे मंदिराच्या जागी मशिद, मनसेचा दावा

वाराणसीच्या ज्ञानवापी (Gyanvapi) मशिदीवरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या जागी मशिद बांधली असल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे. तसेच मशिदीमध्ये नंदी मूर्ती आणि शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आता पुण्यातही मंदिराच्या जागी मशिद उभारण्यात आल्याचा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. पुण्यातील पुण्येश्वर (Puneshwar) आणि नारायणेश्वर (Narayaneshwar) मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या आहेत. असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच मंदिरांच्या मुक्तीसाठी मनसे लढा देणार असल्याचे मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील पुण्येश्व आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी मशीद उभारली असल्याचा दावा केला आहे. पुण्येश्वरालासुद्धा मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्याच्या दिशेने चाल करुन आला. त्याने भगवान शंकर यांचे मंदिर उध्वस्त करुन त्या ठिकाणी बांधली. एक नाही तर दोन मंदिर उध्वस्त करेली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली आहेत. ही मंदिरे कुठे गेली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु त्या मंदिरांच्या जागी शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या जागी मशिदी असल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

मनसे नेते अजय शिंदे यांच्या भूमिकेनंतर मनेस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्ञानवापी मशिद प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद प्रकरण जिल्हा न्यायालय हस्तांतरित केले आहे. आजपासून यावर जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.


हेही वाचा : औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली, मनसे नेते गजानन काळेंचा इशारा