घरठाणेमुख्यमंत्र्यांची पुन्हा शिवाजी महाराजांसोबत तुलना, मनसेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक

मुख्यमंत्र्यांची पुन्हा शिवाजी महाराजांसोबत तुलना, मनसेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणं हे सध्या राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणातून दिसून येत आहे. छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे.

कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी जाण ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा!, असं ट्वीट करत खोचक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

- Advertisement -

आमदार राजू पाटील यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तुलना तर सोडाच… थेट छत्रपती शिवाजी महाराजच… अरे काय चालू काय आहे महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचं. ते पण इतकं, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची तुलना केली होती. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले, असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

‘३५० वर्षानंतर… पुन्हा तोच योग’ या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे.


हेही वाचा : नितीन गडकरींकडून पालखी महामार्गाची पाहणी, उजनी धरणाबाबत केली मुख्यमंत्र्यांकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -