पुण्यात पीएफआयच्या विरोधात मनसे-युवासेना आक्रमक, पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुण्यात पीएफआयच्या विरोधात मनसे-युवासेना आणि भाजप आक्रमक झाले आहेत. पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. त्याविरोधात युवासेना आणि मनसे आक्रमक झाल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे. तर भाजपसह 12 हिंदुत्ववादी संघटनांनी थेट पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा करण्यासाठी निवेदन दिलं आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलनावेळी काहींनी ‘पाकिस्तान झिंदाबाद ’ अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला. याच्या निषेधार्थ आज मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. मोठ्यासंख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. पाकिस्तानचा झेंडा मनसे कार्यकर्त्यांनी जाळला. तर काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.

शिवसेना, मनसे आक्रमक झाल्याचं पाहून भाजपही पुढे सरसावली. त्यांनी तर चक्क पुणे पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षांनीच एवढा जोर लावल्याने पोलिसांनीही त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीप तात्काळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती सर्व कलमं वाढवू आणि दोषींवर कठोर कारवाई करू, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा : आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री..,राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांना टोला