घरताज्या घडामोडीमनसेचा मोर्चा विदर्भाकडे, अकोला महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय

मनसेचा मोर्चा विदर्भाकडे, अकोला महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. आता मनसेनं अकोला महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी पुणे, नाशिक दौरे केले आहेत. राज ठाकरे मुंबईतही पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार होते मात्र त्यांची तब्येत बिघडल्यामुळे हा मेळावा रद्द करण्यात आला होता.

मनसेनं पुणे महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुणे आणि नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी दिली आहे. तर राज ठाकरे स्वतः पुणे आणि मुंबईच्या महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. मनसेनं पहिल्यांदाच अकोला महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली आहे. मनसे नेते विठ्ठल लोखंडकर यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

अकोला महानगराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरु करण्यात येणार आहे. पक्षस्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. अकोलामध्ये मनसे एक भक्कम पर्याय देणार अशी माहिती अकोल्यातील मनसे निरीक्षक विठ्ठल लोखंडकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप अकोला दौरा केला नाही परंतु पुणे आणि नाशिकचे अनेकवेळा दौरे केले आहेत. राज ठाकरे आगामी दिवसांत अकोला महापालिका निवडणुकीसाठी विदर्भ दौरा करण्याची शक्यता आहे. अकोल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा घेणार का? याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -