घरताज्या घडामोडीमनसेकडून रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

मनसेकडून रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून या नेमणुका व्हाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे जाहीर केली आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या नेमणुका व्हाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. (MNS announces appointment of Ratnagiri district office holders)

हेही वाचा – हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत; मनसेची केंद्र सरकारकडे मागणी

- Advertisement -

कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खातं खोलण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यासाठी या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

अविनाश सौंदळकर यांना दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्षपद देण्यात आले आहे, जिल्हा सहसंपर्क अध्यक्ष म्हणून मनीष पाथरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नियुक्त झालेले इतर पदाधिकारी

रुपेश जाधव – तालुका अध्यक्ष, रत्नागिरी
प्रकाश गुरव – तालुका अध्यक्ष, राजापूर
मनोज देवरुखकर – तालुका अध्यक्ष, लांजा
अभिनव भुरण – तालुका अध्यक्ष, चिपळूण
दिलीप लांजेकर – शहर अध्यक्ष, लांजा
प्रशांत सावर्डेकर – शहर अध्यक्ष, चिपळूण
मनीष पाथरे- जिल्हा सहसंपर्क अध्यक्ष, दक्षिण रत्नागिरी
दत्ता दिवाळे – संपर्क अध्यक्ष, राजापूर तालुका
अजित राऊत – संपर्क अध्यक्ष, लांजा तालुका
प्रमोद गांधी – संपर्क अध्यक्ष, गुहागर तालुका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -