मनसेला मोठा धक्का, विदर्भातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

मनसे नेते अतुल वंदिले हे विदर्भातील ओबीसीचे नेते आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वंदिलेंचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.

mns Atul Vandile will go to NCP
मनसेला मोठा धक्का, विदर्भातील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

मनसेमध्ये अनेक नेते नाराज असल्यामुळे गळती लागली आहे. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मनसेच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानंतर आता विदर्भातील बडा नेताही राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. या नेत्याच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर विदर्भात गळती सुरु होण्याची शक्यता आहे. विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. परंतु निवडणुकांची तयारी सुरु असताना पक्षातील बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी लागले आहेत. राज ठाकरे मैदानात उतरुन निवडणुकांसाठी काम करत आहेत. पुणै दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. यानंतर मनसेमध्ये १४० हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. राज ठाकरेंनी औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला आहे. तसेच विदर्भाचाही ते दौरा करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच विदर्भातील मनसेचे उपाध्यक्ष अतुल बंदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. वंदिले मनगटावर घड्याळ बांधणार आहेत.

मनसे नेते अतुल वंदिले हे विदर्भातील ओबीसीचे नेते आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वंदिलेंचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. वंदिले यांच्यासोबत एकूण ४० पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच हिंगणघाटमधील काही पदाधिकारी आणि सरपंचही मनसेमध्ये प्रवेश करतील.


हेही वाचा : राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केल्यावर UP मधील जागा लढवण्याबाबत निर्णय, संजय राऊतांचे वक्तव्य