घरमहाराष्ट्रमनसे-भाजप छुप्या युतीचा नवा प्लॅन?, कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? जाणून घ्या

मनसे-भाजप छुप्या युतीचा नवा प्लॅन?, कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? जाणून घ्या

Subscribe

राज्यात गेली कित्येक वर्षी युतीत असलेल्या भाजप-शिवसेनामध्ये मुख्यमंत्री पदावरुन बिनसलं आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या या निर्णयाने भाजपला मोठा धक्का बसला असून अजूनही ते या धक्क्यातून बाहेर आले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने शिवसेनेला पराभूत करण्यासाठी कंबर कसली असून नव्या मित्राच्या शोधात आहे. (MNS-BJP hidden alliance)

भाजपचा नवा मित्र हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्ष असू शकतो. गेले काही दिवस मनसे-भाजप युतीची चर्चा देखील सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नाशिक येथे धावती भेट झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, भाजपने मनसेच्या परप्रांतियांच्या भूमिकवर बोट ठेवलं. राज ठाकरे यांची परप्रातियांबद्दलची भूमिका काय आहे? यासंदर्भातील राज ठाकरे यांचं भाषण देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं.

- Advertisement -

दरम्यान, मनसे आपली परप्रांतियांबद्दलची भमिका बदलेल आणि हिंदुत्वाचाच झेंडा हाती घेऊन भाजपसोबत युती करेल, अशा चर्चा सुरु होत्या. याचदरम्यान, ठाण्यातील एक परप्रांतीयफेरीवाल्याने मराठी अधिकारी महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची बोट कापली गेली. या घटनेनंतर मनसे पुन्हा परप्रांतियांविरोधात आक्रमक झाली. जेव्हा आरोपी पोलीस स्टेशनमधून सुटेल तेव्हा आम्ही मारु, अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. यावरुन मनसेला परप्रांतियांचा मुद्दा इतक्या सहजासहजी सोडायचा नाही आहे.

मनसे-भाजप छुप्या युतीचा काय असेल प्लॅन?

मनसे आणि भाजप यांच्यात छुपी युती होऊ शकते. प्रत्यक्षात हातमिळवणी न करता शिवसेनाविरोधात ताकद लावतील. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी लाव रे तो व्हिडिओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान पेटवलं होतं. यामुळे भाजप मनसे सोबत थेट युती करुन मोदी समर्थकांची नाराजी ओढवून घेणार नाही.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन उभं रहायचं आणि शिवसेनेची कोंडी करायची. शिवसेनेच्या वॉर्डांमध्ये उमेदवार उभा करुन मराठीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरायचा. तर भाजपने मोदींच्या नावाने आणि शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवसेना आणि काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवायची. त्यानंतर जो काही निकाल येईल त्यात जे संखअयाबळ प्राप्त होईल त्यानुसार मनसे आणि भाजपने एकत्र यायचं, अशी काहीशी रणनीती या पक्षांची असू शकते, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान?

मनसे आणि भाजपने युती केली तर कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान होऊ शकतं, अशा चर्चा सुरु आहेत. मनसे आणि भाजपचं एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे शिवसेनेचं नुकसान करणं. त्यामुळे सध्यातरी मनसे-भाजप युती शिवसेनेसाठी मारक दिसतेय.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -