घरमहाराष्ट्रLoksabha: दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत मध्यरात्री खलबते?

Loksabha: दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत मध्यरात्री खलबते?

Subscribe

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याने, मनसे महायुतीत सहभागी होत असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच, आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मध्यरात्री अज्ञातस्थळी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सुमारे 30 ते 45 मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. या भेटीदरम्यान, महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात तसंच, लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. अशी बातमी एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. (MNS BJP Yuti After Raj Thackeray s visit to Delhi with Devendra Fadnavis at midnight in Mumbai)

देवेंद्र फडणवीस रात्री 11 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. तर, त्याच वेळेत राज ठाकरे हे शिवतीर्थ बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं असून, दोन्ही नेत्यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याचं समजतं. विशेष म्हणजे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा असून या मेळाव्यापूर्वी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने आजच्या मेळाव्यातच पदाधिकाऱ्यांपुढे राज ठाकरे आपली भूमिका मांडतील, असं दिसून येत आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला मनसे पदाधिकाऱ्यांचं समर्थन मिळावं,तसंच आपली भूमिका सर्वांना पटवून देता यावी, यासाठी अंतिम निर्णय पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यापूर्वी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील मनसेच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटबाबत आज अंतिम निर्णय

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात असून आजच महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 10 जागांवरील उमेदवार निश्चित झाले असून, आजच ही यादी माध्यमांमध्ये प्रसारित केली जाऊ शकते. दुसरीकडे महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही यादी अंतिम झाली आहे. त्यांच्या नावांचीही लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : काँग्रेसचे महायुतीला मोठे आव्हान; पटोले, वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, धंगेकर रिंगणात)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -