Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र चांगलं काम करणाऱ्यालाच तिकीट; राज ठाकरेंनी घेतली शाखाध्यक्षांची शाळा

चांगलं काम करणाऱ्यालाच तिकीट; राज ठाकरेंनी घेतली शाखाध्यक्षांची शाळा

Related Story

- Advertisement -

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू झाली आहे. मनसेनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्‍यात या निमित्ताने वाढ झाली आहे. रविवारी ते पुन्हा एकदा पुण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांना त्यांच्या शैलीत मार्गदर्शन केल्याचे दिसून आले. तर यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांची शाळा घेतली. शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळाले असे नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

चांगली प्रतिमा ठेवण्याची सूचना

राज ठाकरे यांनी पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांची शाळाच घेतल्याचे दिसून आले. शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर शाखाध्यक्षांचा प्रत्येक महिन्याचा कामाचा अहवाल राज ठाकरे यांनी मागवला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांचा हा मेळावा घेतला होता. यादरम्यान त्यांनी चांगली प्रतिमा ठेवा आणि लोकांमध्ये मिसला, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या लाटेची भीती दाखवली जातेय

- Advertisement -

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसऱ्या चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असेही ते म्हणाले.


- Advertisement -