घरताज्या घडामोडीतुम्ही बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा, मशिदीवरील भोंगे अन् रस्त्यावरील नमाज बंद करण्याची...

तुम्ही बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा, मशिदीवरील भोंगे अन् रस्त्यावरील नमाज बंद करण्याची घोषणा आज कराच , मनसेचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Subscribe

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा होणार आहे. या सभेतून विरोधकांना मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. भाजप आणि मनसेवर मुख्यमंत्री घणाघात करतील. परंतु मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज बंद करण्याची घोषणा करुन आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न पूर्ण करा असे थेट आव्हान मनसेकडून करण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करा, मशिदींवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज आम्ही बंद करु अशी घोषणा करा असे अव्हान गजानन काळे यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारण्याची हिंमत करा, टोमण्या पलिकडची आज कृती कराच असेही मनसेकडून आव्हान देण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेतून टोमणे मारण्यापेक्षा राज्यातील प्रश्नांवर भाष्य करावे असे मनसेकडून आव्हान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावर करण्यात आलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काय पलटवार करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या सभेतून विरोधकांना करारा जवाब

शिवसेना आणि गर्दी याचे नाते आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही आणि आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसासंदर्भातील विचार, महाराष्ट्र स्वाभिमान आणि विकासाचा विचार याच्यामुळे शिवसेनेचे विचारांचे लोहचुंबक असते. लोकं आपणहून येत असतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी ही सभा आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वातवारण आणि वातवारणात आलेलं मळभ, गढूळपणा हे आजच्या सभेनं खासकरुन उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल आणि इथे फक्त भगव्या रंगाचा धनुष्य आकाशात विहारताना दिसेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -