घरताज्या घडामोडी...तर धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

…तर धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा नेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा नेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांचे कौतुक केले आहे. पत्राच्या माध्यमातून फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तसेचे, “धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही”, असा सल्लाही त्यांनी दिला. (mns chief raj thackeray appreciate letter for devendra fadnavis to take oath of deputy cm)

राज ठाकरेंचे पत्र

- Advertisement -

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

- Advertisement -

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र
राज ठाकरे

Raj thackeray letter

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपा नेते देवेद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. परंतु, त्यावेळी मी स्वत: या मंत्री मंडळात नसेन असेही त्यांनी म्हणले. मात्र, त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बातचीत झाल्यानंतर देवेद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले देवेद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भाजपामध्ये नाराजी सुरू उमटू लागला.


हेही वाचा – शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री अशक्य, नव्या सरकारबाबत ठाकरेंची ठाम भूमिका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -