घरमहाराष्ट्रमराठी पाट्यांचे श्रेय फक्त मनसैनिकांचे!

मराठी पाट्यांचे श्रेय फक्त मनसैनिकांचे!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले सरकारच्या निर्णयाचे कौतुक

राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्थीचे विनियमन) अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून दहा किंवा त्यापेक्षा कमी कामगार असलेली दुकाने, आस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचे श्रेय मनसैनिकांना दिले आहे. शिवाय बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशी तंबीही दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणतात,काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच.महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा, असा सल्लाही राज ठाकरेंनी सरकारला दिला.

- Advertisement -

यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा अप्रत्यक्ष इशारा देखील राज ठाकरे यांनी मराठी पाटी न लावणार्‍यांना दिला.

राज्यात 2008-9 मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी दुकानांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आंदोनल केले होते. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या होत्या. सरकारच्या या निर्णयावर मात्र व्यापारी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

तर, बर्‍याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली. याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला याचा अर्थ शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांना आता मराठी आठवली आहे. असा टोलाही संदीप देशपांडे यांनी सरकारला लगावला आहे.

कोट- महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -