घरताज्या घडामोडी'यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं', राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

‘यांचे अस्तित्व मोदींमुळे, ही सर्व छोटी माणसं’, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Subscribe

कर्नाटकातील निकालवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

कर्नाटकातील निकालवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ‘आपण एखाद्या पराभवातून काय बोध घेतो, हा बोध घ्यायचाच नसेल तर वाघा तुम्ही तसंच. याचे अस्तित्व मोदींमुळे आहे, अन्यथा यांना कोण ओळखतं. ही सर्व छोटी माणसं आहेत’, अशा शब्दांत देवेद्र फडणवीसांना राज ठाकरेंनी टोला लगावला. (MNS Chief Raj Thackeray slams dcm devendra Fadnavis)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला. “ज्यांची पोच नसते त्यांना गोष्टी कळत नाहीत. ही लोक कोण आहेत? ज्यावेळी सभा असतात, त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारे असतात. काही गोष्टी अशा असतात की विरोधकांच्या जरी असल्या तरी, त्या मान्य कराव्या लागतात. ते मोठेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, तर त्यांच्या पक्षातील खालच्या लोकांना कळले पाहिजे”, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भाजप वगळता महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न’

“भारत जोडो यात्रा कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी, त्याचा परिणाम झाला. त्याचा परिणाम आता कर्नाटकात पाहायला मिळाला आणि या गोष्टी मोठ्या मनाने आपल्याला मान्य करावे पाहिजे. आपण एखाद्या पराभवातून काय बोध घेतो, हा बोध घ्यायचाच नसेल तर वाघा तुम्ही तसंच. याचे अस्तित्व मोदींमुळे आहे, अन्यथा यांना कोण ओळखतं. ही सर्व छोटी माणसं आहेत”, असा टोलाही यावेळी राज ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – MVAच्या नेत्यांची शरद पवारांसोबत बैठक, नाना पटोले म्हणाले, ‘वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -