घरताज्या घडामोडी'पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही...'; अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

‘पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही…’; अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Subscribe

मुंबईत आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक नेता जनतेपर्यंत पोहोचत आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मुंबईत आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक नेता जनतेपर्यंत पोहोचत आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या निवडणुकीसाठी सक्रीय दिसत आहेत. अशातच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका मुलखती दरम्यान केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (mns chief raj thackeray son amit thackeray next assembly election)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. तसेच, पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्याचवेळी अमित ठाकरे यांनी औरंगाबाद येथे काही पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणूक लढवणार का, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी “पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही लढवायला तयार आहे”, असे उत्तर दिले.

- Advertisement -

अमित ठाकरे यांच्या या उत्तरामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय, अमित ठाकरे सद्यस्थितीत राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, एककिडे पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी अमित ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरेंची दुसरी पिढी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘खोके सरकारचे हे घाणेरडे राजकारण…’, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -