घरताज्या घडामोडीवारसा हा वास्तूंचा नसून तो विचारांचा असतो - मनसेप्रमुख राज ठाकरे

वारसा हा वास्तूंचा नसून तो विचारांचा असतो – मनसेप्रमुख राज ठाकरे

Subscribe

मला बाळासाहेबांबरोबर मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे. बोट धरून चालतानाचा सहवास आहे. व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे. राजकारणाचा सहवास आहे. त्याच्यामुळे सुरुवात कुठून करायची मला समजत नाही. परंतु जेव्हा मी शिशू वर्गात होतो तेव्हा बाळासाहेब स्वत: गाडीत चालवत मला शाळेत घ्यायला यायचे. एक घरातली व्यक्ती, एक शिवसेनाप्रमुख म्हणून एक व्यक्ती, व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती अशा विविध अंग मी लहान पणापासून एका माणसामध्ये पाहत होतो. वारसा हा वास्तूंचा नसून तो विचारांचा असतो. जर माझ्याकडे काही आलं असेल किंवा मी काही जपलं असेल तर तो मी विचारांचा वारसा जपला आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधीमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाकरे कुटुंबातून राजकारणात सक्रीय असणाऱ्यांमध्ये राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज तीन ते सर्वा तीन वर्षानंतर बाहेरील बोर्डींग आणि सभागृहात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाअगोदर हिंदुहृदयसम्राट हे नाव लागतंय. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायली मिळाली. त्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण येथे होतंय. शेकड्यांनी लोकं येथे आली. बाळासाहेबांनी त्यांना येथे पाठवलं. अशी अजून दोन तैलचित्र येथे असावीत, अशी राहुल नार्वेकर यांना माझी विनंती आहे. एक विधानसभा आणि एक विधान परिषदेत बाळासाहेबांचं तैलचित्र असावं म्हणजे अनेकांना कळेल आपण कोणामुळे इथपर्यंत आलो.

- Advertisement -

हा माणूस कसा होता आणि तो कुठल्या गोष्टींमध्ये मुलायम होता. कोणत्या गोष्टींमध्ये कडवट होता. संस्कार कोणताही माणूस करत नसतो. तर कृती घडत असताना आणि संस्कार होत असताना ते वेचायचे असतात. ते संस्कार मी लहाणपणापासून वेचत गेलो. मी अत्यंत एक कडवड मराठी आहे. माझा जन्म एक अत्यंत कडवड मराठी घराण्यात झाला आहे आणि एका हिंदुत्ववादी घराण्यात झाला आहे. हे कडवट मराठीपण मला लहानपणापासून पाहायला मिळालं. आजूबाजूला बघायला मिळालं. बाळासाहेबांच्या बोलण्यातून ऐकायला मिळालं. त्याबाबतीत हा माणूस बाहेर वेगळा आणि आत वेगळा असा कधीच नव्हता, असंही राज ठाकरे म्हणाले.

1999 साली शिवसेना-भाजपची सत्ता गेली तरीही बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करण्याची संधी ही शिवसेना-भाजपकडे होती. मात्र, त्यावेळी फक्त मराठी मुख्यमंत्री होणार नसल्याचं समजताच बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली.

- Advertisement -

नारायण राणे मुख्यमंत्री असताना काही कारणास्तव मुख्यमंत्री पदावर युती अडकवली होती. 15 दिवस तो खेळ सुरू होता. ऐकेदिवशी दुपारी जावडेकरांसह भाजप नेते मातोश्रीवर आले. त्यांना बाळासाहेबांची भेट घ्यायची होती. आज आपले सरकार बसणार असे ते म्हणत होते. निरोप द्या म्हटले. सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री बनतील हे कानावर घाला असे ते म्हणाले. मग मी बाळासाहेबांना निरोप द्यायला गेलो. मी त्यांना निरोप दिला त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी बसेल दुसरा नाही मग पुन्हा वळून झोपले. मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली.


हेही वाचा : मला खोके नको मी मोदींचा माणूस.., संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -