फ्रॅक्चर हातासह राज ठाकरेंनी आटोपल्या नियमित बैठका, डॉक्टरांनी दिला होता विश्रांतीच्या सल्ला

टेनिस खेळताना झाली दुखापत

mns chief raj thackeray suffers hairline fracture at left hand
फ्रॅक्चर हातासह राज ठाकरेंनी आटोपल्या नियमित बैठका, डॉक्टरांनी दिला होता विश्रांतीच्या सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सोमवारी (काल) सायंकाळी शिवाजी पार्क येथे टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून हेअरलाईन प्लास्टर केलं आहे. दुखापत होताच हिंदुजा हॉस्पीटलमध्ये जाऊन उपचार घेतले. डॉक्टरांनी सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु असे असतानाही त्यांनी आज पक्षाच्या बैठकीला पोहोचत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याचे आदेश राज ठाकरेंनी आज मनसैनिकांना दिलेत. त्यासोबतच, आगामी काळात राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला संबोधित करण्यासाठी राज ठाकरे वांद्र्यात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हाताला प्लास्टर पाहून चर्चेला उधाण आलं होतं.

राज ठाकरे हे कलाप्रेमीप्रमाणेच क्रीडाप्रेमी देखील आहेत. अनेकदा ते शिवाजी पार्कमध्ये खेळाचा आश्वाद घेत असतात. अलीकडेचं फिट राहण्यासाठी त्यांनी टेनिस खेळणं सुरू केलं आहे. शिवाजी पार्क जिमखान्यात चिरंजीव अमित यांच्यासोबत टेनिस खेळतानाचे त्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. राज ठाकरे यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या हाताचा सपोर्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.