घरताज्या घडामोडीहा दागिना 'सराफा'च्या घरीच मिळू शकतो, राज ठाकरेंची 'अशोक पर्वा'त कोटी

हा दागिना ‘सराफा’च्या घरीच मिळू शकतो, राज ठाकरेंची ‘अशोक पर्वा’त कोटी

Subscribe

'प्रत्येक नाटक आणि चित्रपटावर अशोक सराफ यांचे प्रभुत्व असायचे. मी अशोकसराफ यांच्या एका नाट्यप्रयोगाला गेलो होतो. त्यावेळी अशोक सराफ यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. म्हणून मी सांगतो हा दागिना फक्त सराफाच्याच घरी मिळू शकतो. अशी माणसं होणे नाही', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे कौतुक केले.

‘प्रत्येक नाटक आणि चित्रपटावर अशोक सराफ यांचे प्रभुत्व असायचे. मी अशोकसराफ यांच्या एका नाट्यप्रयोगाला गेलो होतो. त्यावेळी अशोक सराफ यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. म्हणून मी सांगतो हा दागिना फक्त सराफाच्याच घरी मिळू शकतो. अशी माणसं होणे नाही’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे कौतुक केले. (MNS Chief Raj Thackeray Talk About Marathi Actor Ashok Saraf On His 75 Birthday)

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं भरभरुन कौतुक केले.

- Advertisement -

“ज्या व्यक्तीला लहानपणापासून पाहिले. त्या व्यक्तीने हा माझा आवडता हे सांगितल्यावर भरून आले. अशोक सराफ यांचे आतापर्यंत बरेच चित्रपट आणि नाटकं मी पाहिले. समोर कोणीही असुदेत अशोक सराफ यांना फरक कदीच पडला नाही. प्रत्येक नाटक आणि चित्रपटावर अशोक सराफ यांचे प्रभुत्व असायचे. मी अशोक सराफ यांच्या एका नाट्यप्रयोगाला गेलो होतो. त्यावेळी अशोक सराफ यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ५० ते ६० वर्ष स्वत:बद्दलचे कुतुहल जपून ठेवणे सोपं नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.

“आजही अशोक सराफ यांचे नाव घेतल्यानंतर नाट्यगृहातील कोपरा-कोपरा भरलेला असतो. मी अशोक सराफ यांना अभिनेताच म्हणीन, त्यांना विनोदी अभिनेता म्हणणे चुकीचे आहे. कारण विनोद करण फार कठीण असते”, असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“आज अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ती व्यक्ती मुख्यमंत्री झाली असती. ४० फुट असलेला बॅनर लावला असता आणि त्यावर दुध टाकलं गेलं असतं. पण आपल्या महाराष्ट्र असे काही नाही. कलावंत आहे ना, मग ठीक आहे. एवढ्यावर आपल्याकडे आटोपलं जातं. पण त्या कलाकारचं महत्व काय असते ते परदेशी गेल्याशिवाय नाही कळत. परदेशात कलाकारांच्या नावाने विमानतळ आहेत आणि आपल्याकडे कलाकारांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात, तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. कलावंत म्हणून मी नेहमीच अशोक सराफ यांचा आदर ठेवला”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करताना महाराष्ट्रातील सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

“मला आज समजलं की, तुमचे मुळ घराण हे बेळगावचे आणि तुमचा जन्म मुंबईचा. माझ्यामते तुम्ही खरा सीमावाद सोडवलात. अशोक सराफ तुम्ही म्हणालात की तुमचा सत्कार मी करणार, पण मी तुम्हाला सांगतो की हे चुकीचे आहे. कारण मोठ्या माणसांचा सत्कार करायला मोठी माणसंच राहिलेली नाहीत. त्यामुळे आमच्या सारख्यांवर आटपावं लगातंय. पण मी तुम्हाला एक सांगतो, की तुम्ही जर आता युरोपात असता तर तुमच्या सत्कारासाठी त्यावेळी व्यासपीठावर युरोपचे पंतप्रधान असते”, असेही राज ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – धुक्यानं घेतला चीनमधील 17 जणांचा जीव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -