घरताज्या घडामोडीमनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रात सर्वाधिक, राज ठाकरेंचा दावा

मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रात सर्वाधिक, राज ठाकरेंचा दावा

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन आज 16ते17 वर्ष झाली. या वर्षांमध्ये आपण पक्ष म्हणून ज्या-ज्या भूमिका आणि जी आंदोलनं केली. तर त्या आंदोलनाचा यशस्वी होण्याचा रेट आपण काढला तर, महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वात जास्ती यश आलेले आहे, अशी मनसेच्या आंदोनलाबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन आज 16ते17 वर्ष झाली. या वर्षांमध्ये आपण पक्ष म्हणून ज्या-ज्या भूमिका आणि जी आंदोलनं केली. तर त्या आंदोलनाचा यशस्वी होण्याचा रेट आपण काढला तर, महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वात जास्ती यश आलेले आहे, अशी मनसेच्या आंदोनलाबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ‘मी आता एक पुस्तिका काढत आहे. यामध्ये आपण केलेल्या सर्व आंदोलनाची माहिती असणार आहे’, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाचा मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनीमनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मनसेकडून आंदोलनाची पुस्तिका काढणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. “आजचा आपला हा मेळावा झाल्यानंतर अनेक मेळावे होतील. सध्या कोरोनामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यावेळी डिसेंबर किंवा मार्च, फेब्रुवारी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा हा मेळावा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन आज 16ते17 वर्ष झाली. या वर्षांमध्ये आपण पक्ष म्हणून ज्या-ज्या भूमिका आणि जी आंदोलनं केली. तर त्या आंदोलनाचा यशस्वी होण्याचा रेट आपण काढला तर, महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षापेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वात जास्ती यश आलेले आहे. पण काही यंत्रणा सुरू असून काही राबवल्या जातात. या यंत्रणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलन लोकांच्या विस्मरणाच कसे जातील यासाठी काम करत असतात”

- Advertisement -

“आपण केलेले टोलचे आंदोलन हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी हे आंदोलन महाराष्ट्रभर रेटलं. त्यावेळी अनेकांना अटक झाली. अनेकांवर केसेस पडल्या. पण जवळपास 65ते67 टोल नाके बंद झाले. ज्यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू त्यांना अद्याप एकाही पत्रकराने सवाल विचारलेला नाही, पण आम्हाला मात्र जरूर प्रश्न विचारले. मी आता एक पुस्तिका काढत आहे. यामध्ये आपण केलेल्या सर्व आंदोलनाची माहिती असणार आहे. रेल्वेचे आंदोलन केले. त्यावेळी यूपी-बिहार विरोधात आंदोलन केले असे पसरवले होते. पण हे आंदोलन खरे महाराष्ट्रात आलेल्या यूपी-बिहारांकरांसाठी होते. महाराष्ट्रात नोकऱ्या निर्माण होणार आणि महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींना इथे नोकऱ्या निर्माण झाल्या त्याची माहितीही मिळणार नाही. पण दुसऱ्या राज्यांमध्ये या नोकऱ्यांच्या जाहिराती येणार आणि माझ्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येणार नाही, हे कोणते राज्य सहन करेल”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, “ज्यावेळी ते बिहारी लोक रेल्वे स्थानकात झोपले होते. त्यावेळी त्या बिहारच्या लोकांना आम्ही विचारले तुम्ही इथे का झोपलात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही रेल्वेच्या परीक्षांसाठी इथे आलो आहे. त्यावेळी आम्ही विचारले कसल्या रेल्वेच्या परीक्षा, तर त्यांनी सांगितले महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत. तिथे त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी त्या बाहेरून आलेल्या एकाने आपल्या महाराष्ट्र सैनिकाला आईवरून शिवी दिली. त्यामुळे त्यानंतर पुढचा सगळा हंगामा झाला”

- Advertisement -

”गुजरातमध्ये एक अत्याचाराची घटना घडल्यानंतर तेथील अल्पेश ठाकूर या आमदाराने परप्रांतियांना बेदम मारुन हाकलून दिलं होतं. त्यानंतर गुजरातमधून २० हजार उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांना हाकलून दिलं. २०१९ला त्याच अल्पेश ठाकूरला पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. हे दिसत नाही का?”, असा सवालही यावेळी ठाकरेंनी विचारला.

“बाळासाहेबांची इच्छा होती. भोंगे निघाले पाहिजेत. आपण काढायला नाही सांगितलं. फक्त हनुमान चालिसा लाऊ म्हणालोत आणि भोंगे उतरले. अजूनही काही ठिकाणी चर्बी उतरलेली नाही. जिथे जिथे भोंगे चालू असतील तिथे पोलिसांकडे तक्रार करा. पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. पोलिसांकडून काही झालं नाही तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असंच होणार”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा इशारा दिला.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -