घरमहाराष्ट्रलवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो - राज ठाकरे

लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो – राज ठाकरे

Subscribe

मनसे अध्यक्षांकडून सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेंची विचारपूस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे महापालिकेच्या अनधिकृत फेरीवाल्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आयुक्तांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो अशा शब्दात राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला आहे.

राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कल्पिता पिंपळे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ‘कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. लवकरं बरे व्हा असे मी सांगायला आलो होतो. दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे एक म्हणजे अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले, आमचं आंदोलन होत ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होते… काल म्हंटल्याप्रमाणे, जे काही घडलेय त्याचं दुख: आहेच. काळपण सोकावतोय. अशा प्रकारची हिंम्मत ठेचणे गरजेचे आहे. पोलीस कारवाई करतायत. न्यायालयही त्यांच कर्तव्य बजावेल अशी अपेक्षा आणि आशा आहे. त्याला कठोर शिक्षा होईल. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

- Advertisement -

घोडबंदर भागातील कासारवडवली येथे सोमलवारी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु असताना माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याच्याही हाताचे एक बोट तुटले आहे. या दोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाई सुरु केली आहे. अशातचं आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जखमी कल्पिता पिंपळेंची भेट घेतली. दरम्यान सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज
ठाकरेंनी त्या फेरीवाल्याला सोडणार नाही अशा संताप व्यक्त करत “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील,” असं राज म्हणाले आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -