शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राचे 20 मुख्यमंत्री ठरले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरून त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना एक सुचक सल्लाही दिला आहे.
राज ठाकरे यांचे ट्विट
एकनाथ शिंदेजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन, खरचं मनापासून आनंद झाला, नाशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे राज ठाकरे यांनी त्यांना सुचक सल्ली देत लिहिले की, आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, पुन्हा एकदा आपले अभिनंदन.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022