घरताज्या घडामोडीमनसैनिकांकडून बृजभूषण यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मनसैनिकांकडून बृजभूषण यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Subscribe

उत्तरप्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग (MP Brijbhushan Singh) यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे.

उत्तरप्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह (MP Brijbhushan Singh) यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. मनसेच्या दादर मधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकीलांनी दादर पोलीस ठाण्यामध्ये (Dadar) ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्यामुळे मनसेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मनसेच्या उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतना त्यांनी, राज ठाकरे यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्यामुळे आणि दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे म्हणुन केल्याचे सांगितले. शिवाय, बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या जनहीत कक्षाच्या वकिलांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राच्या मातीवर पाऊल ठेवल्यास तंगडेच तोडू; मनसेचा बृजभूषण सिंह यांना इशारा

यावेळी दादर पोलीस स्थानकाबाहेर मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड. गजणे, ॲड. रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्ये उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे खेळाचं मैदान सोडून पळत आहेत, बृजभूषण सिंह यांचा टोला

बृजभूषण सिंह काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीशी बोलतान बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही. बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान रामने शिक्षा ग्रहण केली होती. विश्वमित्रने लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलोय”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले होते.


हेही वाचा – नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार हनुमान चालिसा पठण; पुन्हा वादाची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -