घरताज्या घडामोडीलायसन्स काढताना मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची...

लायसन्स काढताना मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची मागणी

Subscribe

मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावं मराठी भाषा आरटीओच्या पोर्टलवर नाही आणली तर मराठी भाषा मनसे स्टाईल आंदोलन

संपुर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनसुद्धा राज्यातील सर्व आरटीओमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच लायसन, वाहन परवाना काढण्याचे अर्ज भरून घेतले जातात. यामध्ये कुठेही मराठी भाषेचा उल्लेख होत नाही हे दुर्दैवी आहे. यासाठी मनसेतर्फे अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. येत्या ८ दिवसांमध्ये निवदेनावर विचार झाला पाहिजे तसचे संपुर्ण महाराष्ट्रात मराठीमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली पाहिजे अशी मागणी पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे.

पुणे विभाग प्रादेशिक परिवहन महामंडळ (आरटीओ) मुख्य अधिकारी अजित शिंदे यांची मनसे वाहतूक सेना शहरअध्यक्ष शिवाजी पाटील आणि सहकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. मराठी माणसाच्या जोरावर शिवसेना सत्तेत आली आहे. परंतु शिवसेना सत्तेत असतानासुद्धा आणि विशेषता परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते अनिल परब असतानासुद्धा ड्रायव्हिंग लायसनचा फॉर्म हा हिंदीत आणि इंग्रजीमध्ये येतो इथे मराठीला कुठे प्राधान्य नाही. या राज्यात मराठी भाषा अतिशय महत्त्वाची आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आपली मातृभाषा ही मराठी आहे. नागरिकांची लर्निंग लायसन काढण्यासाठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये फॉर्म भरून मग चाचणी घेतली जाते. आरटीओमध्ये निवदेन दिल्यानंतर सांगण्यात आलं की या सर्व गोष्टी केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असतात. केंद्र सरकारच्या फॉर्ममध्ये सुद्धा हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश आहे. मराठीला कुठेही प्राधान्य नाही आहे. अजित शिंदे यांना सांगितले आहे की, त्वरित या पोर्टलवर मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावं मराठी भाषा आरटीओच्या पोर्टलवर नाही आणली तर मराठी भाषा मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशाराच वसंत मोरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

पुण्यातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, स्कुल बस, मिनी बस, अशांना पासिंग करताना स्टिकर लावावे लागतात हे स्टिकर फार महागडे आहेत. १००० ते ५००० रुपयांना ते स्टिकर पडतात. यासाठी ४ कंपन्या आहेत या कंपन्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही कंपन्यांचे स्टिकर चालत नाहीत. आता पासिंगची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत कारवाई करु असे मुख्य अधिकारी अजित शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातील वाहतुकीसाठी काही अडचणी असल्यास नागरिकांनी वाहतूक सेनेशी संपर्क करावा असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -