घरमहाराष्ट्रउर्जा खात्यातील 'वाझे' मनसेने आणला समोर; ऊर्जा मंत्र्यांना दिला इशारा

उर्जा खात्यातील ‘वाझे’ मनसेने आणला समोर; ऊर्जा मंत्र्यांना दिला इशारा

Subscribe

ऊर्जा खात्यातील ‘वसुली एजंट’ कोण, याबाबतचा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस आणि संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. महावितरण कंपनीचे संचालक असलेले संजय ताकसांडे हेच उर्जा खात्यातील ‘वाझे’ आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे. ऊर्जा खात्यातील ‘वसुली एजंट’ वर कारवाई करा नाहीतर ऊर्जा मंत्र्यांना कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा देखील मनसेने दिला आहे.

“संजय ताकसांडे यांचं काम हे वसूली करुन देण्याचं काम आहे. यांच्यावर असंख्य गुन्हे दाखल दाखल आहेत. त्यांना १५ दिवसांची कोठडी झाली आहे. या व्यक्तीला बडतर्फ करण्यात आलं होतं. बडतर्फ करुन पुन्हा या पदावर कसं आणलं? याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाकडून आलेले आहेत. असं असून या व्यक्तीची चौकशी का केली नाही?” असा सवाल मनसेने केला आहे. संजय ताकसांडे यांना अटक झाली तेव्हा विभागीय चौकशी झाली. तेव्हाचे उर्जा खात्याचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना नियुक्त केलं. त्याला देखील राज्य सरकारने हरताळ फासला, असं हेमंत संभूस यांनी म्हटलं.

- Advertisement -

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आम्ही या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. पत्र देखील दिलं आहे. उर्जामंत्री नितीन राऊत जर स्वत: स्वच्छ असतील तर त्यांनी स्वत: त्यांना निलंबित करावं. जर त्यांना निलंबित केलं गेलं नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. मग उर्जा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा लागला तरी आमची तयारी आहे. त्याचे परिणाम ते भोगतील. जर असे भ्रष्ट अधिकारी बसणार असतील आणि लोकांच्या गळ्याला फास लागणार असेल तर आम्ही उर्जा मंत्र्यांना देखील सोडणार नाही. उर्जा मंत्र्यांचं घराच्याबाहेर देखील फिरणं बंद होईल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -