घरताज्या घडामोडीकोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचे आदेश काढावे, मनसेची मागणी

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचे आदेश काढावे, मनसेची मागणी

Subscribe

कोरोना ने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी,बस फी यावर्षी सर्वच शाळांनी माफ करावी.

मागील वर्षापासून कोरोना संकटाशी देश सामना करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आला होता. मोठ्या कालावधीनंतर उद्योग धंदे सुरु झाल्यामुळे सामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध होत होता परंतु आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना संकटात शाळा ऑनलाईन सुरु आहेत काही शाळांनी विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांची फी माफ करावी असे आदेशच सरकारने काढावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी केली आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोना ने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी,बस फी यावर्षी सर्वच शाळांनी माफ करावी. किंबहुना शिक्षण मंत्र्यानी सरसकट तसे आदेशच दयावेत. छत्तीसगड येथील खाजगी शाळांनी मनाचा मोठेपणा दाखवत तसा निर्णय घेतला आहे. असे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

- Advertisement -

बाळा नांदगावकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विनंती केली आहे. राज्यात कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार बुडाले असुन अनेकजण बेरोजगार झाले आहेत. परंतु शाळा ऑनलाईन सुरु असल्यामुळे शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची फी वसुली सुरु केली आहे. शाळांची फी भरली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आले नाहीत. तसेच अनेक पालकांना शाळांकडून त्रास दिला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे यापुर्वीही शाळांची फी माफ करण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -