पोलीस कर्मचारी व कुटुंबासाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा उपलब्ध करावी, मनसेची मागणी

अवघ्या महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळींवर मोक्याच्या ठिकाणी शिघ्रतेने पोलीस व पोलीसांच्या कुटूंबियांसाठी ड्राइव्ह इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

MNS demands drive-in vaccination facility for police personnel and families
पोलीस कर्मचारी व कुटुंबासाठी ड्राईव्ह इन लसीकरण सुविधा उपलब्ध करावी, मनसेची मागणी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढता आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना काळात सर्वच पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत करत आहेत. पोलीस कर्मचारी व त्यांची कुटुंब कोरोनाबाधित होत आहेत. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रांवर, मैदानांवर पोलीस कर्मचारी व कुटुंबासाठी ड्राईव्ह इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मागणी केली आहे.

मनसे सरचिटणीस रिता गुप्ता यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या वैद्यकीय युद्ध परिस्थितीत महाराष्ट्रात पोलीस दल आपली सेवाव्रत अखंडपणे, आपल्या जीवाची बाजी लावून करीत आहेत. पोलीस दलात प्राणघातक ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस व पोलीसांच्या य आरोग्याची अधिक आणि विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एकंदरीत अॅप्लिकेशनमध्ये नोंदणी करण्यात जाणारा वेळ, उन्हाच्या तडाख्यात, लागणाऱ्या रांगा आणि गर्दी या नेहमीच्या ‘कटकटीमुळे पोलीसांच्या कुटूंबियांना लसीकरण पासून वंचीत राहावे लागत आहे, ह्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या मनोधैर्यावर पडू लागला आहे असे समजते.

कोरोना’ विषाणूने आतापर्यंत संपूर्ण जगाला प्रचंड हादरवले आहे, कोरोनाच्या उद्रेकाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण हेच उत्तम शस्त्र आहे म्हणूनच देशातील नागरिकांचं लसीकरण शिग्रतेने होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने व वरील गंभीर बाबी लक्षात घेता तमाम जनतेच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागणी करते कि मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र, मुंबई नायगांव, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मुंबई कोले कल्याण, कालिना पोलीस जिमखाना,मुंबई व अन्य ठिकाणी तसेच उत्तम नियोजन असेल, तर अवघ्या महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळींवर मोक्याच्या ठिकाणी शिघ्रतेने पोलीस व पोलीसांच्या कुटूंबियांसाठी ड्राइव्ह इन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. वरील नमूद सर्व ठिकाणी मोठी मैदाने व जागा उपलब्ध असल्यामुळे लसीकरण केंद्रामध्ये गाड्यांना येण्या- जाण्यासाठी एकल मार्गिका, बॅरिकेडस, गाड्यांसाठी नियंत्रण कक्ष उभे केले जाऊ शकतात. गाड्यांच्या पार्किंगची सुविधा मैदानामध्येच होऊ शकते, त्यामुळे बाहेर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही.

राज्यात कोरोना विरुद्ध आपल्या नेतृत्वामध्ये सुरु असलेल्या लढ्यात पोलीस दल अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. कुटुंब प्रमुख ह्या सर्वांच्या आरोग्याची व सुरक्षतेची काळजी आपण घेत असालच, पण अधिक घ्यावीत, म्हणूनच ही कळकळीची मागणी आपणांस करीत आहे. पोलीस व पोलीस कुटुंबियांच्या हितासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालून सदरची अंमलबजावणी त्वरित कराल हीच आपक्षे. ही सर्व जनसेवा करत असताना आपण व आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आपली व कुटुंबाची सर्वोतपरी काळजी घ्यावी ही अशी विनंतीही मनसे सरचिटणीस रिता गुप्ता यांनी पत्राद्वारे केली आहे.