घरक्राइममुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; मनसेच्या सैनिकांना अटक

मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; मनसेच्या सैनिकांना अटक

Subscribe

मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांना अटक करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद-संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळू शकतो, यापार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांना अटक करण्यात आली आहे. तर शहर अध्यक्ष सतनाम सिंह गुलाटी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत अलटीमेटम देण्यात आला होता. मात्र, अद्याप नामांतरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर येण्याअगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा

‘औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करा’, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी जोर धरत असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेसने या मागणीला विरोध दर्शवला. त्यानंतर मनसे अधिकच आक्रमक झाली होती. जो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल, त्यांना मनसे सोडणार नाही, असे देखील बजावण्यात आले होते. तसेच औरंगजेबाच्या मागे महाविकास आघाडी सरकार राहत असेल तर यांना सत्तेत राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. कोणी जर संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करत असेल तर मनसे ते खपून घेणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, आज मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर येताच खबरदारी म्हणून मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Farmers Protest : परदेशी रिहानाची कोरोना काळात ७ कोटींची मदत; सचिन तेंडूलकरने काय दिले?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -