मुख्यमंत्र्यांना टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट अबू आझमींकडून आली, मनसेचा हल्लाबोल

संभाजीनगर होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले आहे. ना हिंदूंच्या मुद्द्यावर बोलले ना विकासाच्या प्रश्नावर बोलले. त्या औरंगजेबाच्या थडग्याबद्दल मुख्यमंत्री ब्र काढत नाहीत. ना भोंग्यांबद्दल ना नमाजाबद्दल बोलत आहेत असे गजानन काळे म्हणाले.

MNS gajanan kale attack cm uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांना टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट अबू आझमींकडून आली, मनसेचा हल्लाबोल

औरंगाबादमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे चला हवा येऊ द्या चा प्रयोग असल्याची टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबू आझमींनी दिली होती असा घणाघात गजानन काळे यांनी केला आहे. औरंगाबमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी सभा घेतली होती. या सभेमधून विरोधकांनी टीकास्त्र डागलं आहे. भाजपवर हिंदुत्वावरुन मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला आहे. परंतु औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फार बोलले नाही. पहिला विकास मग संभाजीनगर अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली यावरुन मनसेनं टीकास्त्र डागलं आहे.

मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवर टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टोमाणा सभेचा दुसरा अंक अत्यंत गोंधळलेल्या भाषणाने झाला. मुळातच आम्हाला वाटलं होते की, टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन येईल परंतु आम्ही चुकलो मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आली होती. ज्या संभाजीनगरच्या भोवती बाळासाहाबेंनी सांगितल्यानंतर १९८८ पासून आतापर्यंत जे राजकारण समाजकारण पेरलं त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी ब्र सुद्धा काढला नाही. संभाजीनगर होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले आहे. ना हिंदूंच्या मुद्द्यावर बोलले ना विकासाच्या प्रश्नावर बोलले. त्या औरंगजेबाच्या थडग्याबद्दल मुख्यमंत्री ब्र काढत नाहीत. ना भोंग्यांबद्दल ना नमाजाबद्दल बोलत आहेत असे गजानन काळे म्हणाले.

औरंगबादचा पाणी प्रश्न, गेल्या तीन दशकांपासून संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा महापौर आहे. शिवसेनेचा नगरसेवक, आमदार आणि खासदार आहे. तरीसुद्धा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. नाशिकला फक्त पाच वर्षात २६५ कोटीची योजना आणून २०४६ पर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिककरांचा पाणी प्रश्न सोडवला. परंतु आतासुद्धा मुख्यमंत्री म्हणतात लवकरच यावर तोडगा काढणार, एकाही गोष्टीवर मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पिंज-यात वाघ सापडे,हिंदू व मराठी जनता मारती खडे अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.


हेही वाचा : भाजपचा आक्रोश मोर्चा औरंगाबादकरांच्या पाण्यासाठी नाही तर सत्तेसाठी, मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांवर टीकास्त्र