भविष्यात सुळे महिला मुख्यमंत्री तर राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री, मनसेचा खोचक टोला

भविष्यात राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री नको हे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. परंतु पुढच्या काळात पुढच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीकडून संजय राऊत उपमुख्यमंत्री हे चित्र पाहणं फक्त शिवसैनिकांना बाकी आहे. असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे.

MNS gajanan kale said Supriya Sule is the woman CM while Sanjay Raut is the DCM
सुप्रिया सुळे महिला मुख्यमंत्री तर संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री, मनसेचा खोचक टोला

राज्यात भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीकडून महिला मुख्यमंत्री तर खासदार संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होतील असा खोचक टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे संपूर्ण पक्ष घेऊन दर्शनाला येईल असा नवस सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानीला केला आहे. यावरुन राज्यात टोलवा टोलवी होताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच पुढील २५ वर्षे कायम असतील असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यावरुन मनसेने टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रात राजकारणात खळबळ माजील आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादीचा सध्या उपमुख्यमंत्री आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे यांनी नवस केला आहे. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पुढील २५ वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात असे राऊत म्हणाले. यावर मनसेने टोला लगावत राऊत राष्ट्रवादीकडून भविष्यात उपमुख्यमंत्री असतील असे म्हटलं आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. विश्वप्रवक्ते संजय राऊत म्हणाले २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर सुप्रिया सुळे म्हणतात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास नवस फेडायला येईल. शिवसेनेतले गजानन किर्तीकर, संजय जाधव, श्रीकांत शिंदे इतर सर्व नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. परंतु राऊतांना मनसेच्या कोंडीची काळजी पडली आहे. भविष्यात राष्ट्रवादीला शिवसेनेचा मुख्यमंत्री नको हे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. परंतु पुढच्या काळात पुढच्या काळात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीकडून संजय राऊत उपमुख्यमंत्री हे चित्र पाहणं फक्त शिवसैनिकांना बाकी आहे. असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे.

राऊत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार आणि अजित पवार सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वार आनंदी आहेत. त्यामुळे कोणाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याकडे दुर्लक्ष करावे असे संजय राऊत म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा नवस

राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : नोटबंदी धोरणात मोठी चूक; गृहमंत्र्यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल